आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात 'एनडीए'ने बाजी मारली. 'एनडीए'च्या विजयानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला. यावेळी रामेश्वर तेली यांनी भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री शपथ घेतली. हिमंत बिस्वा सरमा यांच्यासहित ४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा मतदारांनी सत्तास्थापनेसाठी कौल दिला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. आसाममध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे. या निकालाने लोकांचा भाजपवर विश्वास असल्याचे दिसून आल्याचेही हिमंत यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.