Hinjewadi IT Park Saam Tv
Video

Pune Rain: ३० मिनिटांच्या पावसाने पुण्यातील रस्ते पाण्याखाली, हिंजवडी IT पार्क झालं वॉटरपार्क; पाहा VIDEO

Hinjewadi IT Park: पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले. या पाण्यातूनच बसमधून काहींनी प्रवास केला. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

पुण्याला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसाचा फटका हिंजवडी आयटी पार्क परिसराला देखील बसला. या पावसामुळे आयटी पार्कमधील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून पीएमपीएमएलची इलेक्ट्रिक बस मार्ग काढताना दिसत आहेत. जणू हिंजवडी परिसरामध्ये पूर आल्याचे चित्र दिसत आहे. या पूरस्थितीत जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत असं चित्र हिंजवडी परिसरामध्ये निर्माण झाले होते.

फक्त ३० मिनिटांमध्ये झालेल्या पावसाने हिंजवडीची अशी दयनीय अवस्था झाली होती. हिंजवडी एमआयडीसी प्रशासन, पी एम आर डी ए प्रशासन आणि हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील नागरिकांना अशी पूर सदृश्य परिस्थितीतून प्रवास करण्याची वेळ ओढवली होती. हिंजवडीतील पूरस्थितीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT