nashik news  Saam Tv
Video

Nashik News: उन्हाचा तडाखा वाढला; पुढील तीन दिवस यलो अलर्ट,VIDEO

Yellow Alert: एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे उष्माघाताने अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढत असून, रविवारी हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. रविवारी दुपारी नाशिकचे तापमान तब्बल ३९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. वाढत्या तापमानासोबत ढगाळ हवामानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.

हवामान विभागाने नाशिकसह परिसरासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यावर गडगडाटासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे.

नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, गरजेच्या कामाशिवाय उन्हात जास्त वेळ बाहेर पडू नये, तसेच पाणी आणि थंड पेय पदार्थांचा अधिकाधिक वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT