gulabrao patil  saam tv
Video

Maharashtra politics: गुलाबराव देवकरांचा पक्षप्रवेश; महायुतीत पुन्हा धुसफूस, गुलाबराव पाटील संतापले अन् अजितदादांना घेरले|VIDEO

Minister Gulabrao Patil Slams : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच महायुतीमध्ये सारेकाही आलबेल आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. वेगवेगळ्या कारणांवरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे दिसत आहे.

Omkar Sonawane

खानदेश भागातील मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ज्या देवकरांनी नेहमी अजितदादांवर टीका केली, अजित दादांना काळे झेंडे दाखवले. त्याच गुलाबराव देवकरांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतले आहे. गुलाबराव देवकर जे आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके,खोके म्हणत होते, ते काय आता ओके झाले काय? असा घणाघाती सवाल त्यांनी केला.

आपण केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी हे लोक त्या पक्षात गेलेले आहेत. देवकर यांच्या जेव्हा शंभर गोष्टी बाहेर येतील तेव्हा अजितदादा सुद्धा म्हणतील गुलाबराव पाटील खरं बोलत होते. देवकर यांना पक्षात घेण्याआधी अजितदादांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करायला हवी होती. खरेच हे महायुतीचे धोरण आहे का? असेही पाटील म्हणाले. या पक्ष प्रवेशानंतर महायुतीमध्ये पुन्हा एकदा धुसपुस पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: अवनीत कौरचा 'बोले चूड़ियां' लूक तुम्ही खास सोहळ्यासाठी करु शकता कॉपी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन कधी होणार? मंडळाने वेळ सांगितली

Maharashtra Live News Update: : विरार पोलीस ठाण्याच्या गणरायाचा विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

Navratri Festival 2025: नवरात्र 2025 कधी आहे? तारीख, मुहूर्त आणि पूजा माहिती

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी डावललं, कोळी बांधवांचा आरोप; मंडळाकडून मोठं वक्तव्य, सांगितलं...

SCROLL FOR NEXT