Government officials and police strategize to prevent Manoj Jarange’s planned mass mobilization in Mumbai during Ganeshotsav. Saam Tv
Video

Manoj Jarange: मुंबईत धडकणाऱ्या मनोज जरांगेंना रोखण्यासाठी सरकारचा प्लॅन A आणि प्लॅन B काय?

Government Plans A and B to Stop Manoj Jarange: आधीच्या आंदोलनापेक्षा 5 पट गर्दीसह मराठा समाज मुंबईत धडकणार, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.. त्यानंतर सरकारने जरांगेंना रोखण्यासाठी मेगा प्लॅन आखलाय.. हा प्लॅन नेमका काय आहे? आणि सरकार जरांगेंना कसं रोखणार?

Bharat Mohalkar

ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी 29 ऑगस्टला मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगेंनी केला आणि सरकारचे धाबे दणाणले आहेत..त्यामुळे जरांगेंना रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं झालीत.. याच बैठकीत जरांगेंना रोखण्यासाठी सरकारने विशेष रणनीती आखलीय...

ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबईत येणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.. त्यामुळे सरकारने तातडीनं पावलं टाकायला सुरुवात केलीय. सरकारने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय उपसमितीची स्थापना केलीय... ही समिती मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेणार आहे...त्याबरोबरच मराठा कुणबी प्रमाणपत्रांविषयी शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली असली तरी जरांगेंनी मात्र आपल्या मूळ मागणीवर बोट ठेऊन सरकारला इशारा दिलाय.. तर भाजपच मराठा समाजाला न्याय देईल, असा विश्वास मंत्री आशिष शेलारांनी व्यक्त केलाय...खरंतर 1 सप्टेंबर 2023 ला आंतरवली सराटीत जरांगेंच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला आणि आंदोलनाचा भडका उडाला. या आंदोलनात आतापर्यंत नेमकं काय घडलं?

जरांगेंच्या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे 6 सप्टेंबर 2023 ला मराठा कुणबी नोंदींच्या शोधासाठी माजी न्यायमुर्ती संदीप शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना केली...त्यानंतर आंतरवली सराटी ते मुंबई यात्रेदरम्यान वाशीत 26 जानेवारी 2024 ला सगे-सोयरे अध्यादेशासंदर्भातील मसुदा सोपवण्यात आला..एवढंच नाही तर 20 फेब्रुवारी 2024 ला मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलं.

आता मनोज जरांगेंनी आधीच्या आंदोलनापेक्षा 5 पट जास्त गर्दीसह मुंबईत धडकणार असा निर्धार केलाय. ठिकठिकाणी त्याची तयारीही सुरु झालीय.. त्यामुळे सरकारला ऐन गणेशोत्सवात जरांगेंना रोखण्यात यश मिळणार की जरांगे आझाद मैदानावर ठिय्या मांडणार याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT