Political controversy erupts after BJP MLA Narendra Mehta is allegedly labeled ‘land mafia’ in an official government document. Saam Tv
Video

सरकारी पत्रात भाजप आमदाराचा भूमाफिया उल्लेख; नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ, पाहा VIDEO

BJP MLA Narendra Mehta Land Mafia Allegation Maharashtra: सरकारी पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा ‘भूमाफिया’ असा उल्लेख झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली असून महसूल मंत्री बावनकुळे यांनी तपासाचे आश्वासन दिले आहे.

Omkar Sonawane

शासकीय पत्रातच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसनेते नाना पटोले यांनी याविषयीची माहिती विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांना दिली. तसेच ते पत्र ही समोर आणले. सरकारी पत्रातच नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा करण्यात आला आहे. त्यांनी स्टँप ड्यूटी बुडवल्याचा आणि मराठी आणि गुजराती नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप देखील नाना पटोले यांनी केला. या सर्व आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बावनकुळे म्हणाले, नाना पटोले हे राजकरणामुळे आणि पार्टीबाजीमुळे असे आरोप करत आहे. ही जी काही नरेंद्र मेहतांची तक्रार आहे त्याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: कॉल आणि एसएमएसने कॅन्सल होऊ शकतं ट्रेनचं तिकीट?

Motichur Laddu Recipe: घरी असलेल्या कार्यक्रमासाठी झटपट बनवा मऊ, रसाळ मोतीचूर लाडू; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: जालन्यातील अंबड वडीगोद्री रस्त्यावरील शहापूर परिसरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक

Breast Cancer Symptoms: स्तनामध्ये दिसणारी गाठ म्हणजेच कर्करोग नाही; त्वचेवर दिसणारी ब्रेस्ट कॅन्सरची ही ५ लक्षणं वेळीच ओळखा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक प्रकृती बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT