Farmer ID Card Saam TV
Video

Farmer ID Card : शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नवीन ओळख; 'या' ओळखपत्रामुळे होणार मोठा फायदा

Farmer ID Card Latest Update : केंद्र सरकार येत्या काळात शेतकऱ्यांना नवीन ओळपत्र देणार आहेत. आधार कार्डसारखेच हे ओळखपत्र असणार आहे. यासाठी लवकरच नोंदणी सुरू होणार आहे.

Satish Daud

केंद्र सरकार येत्या काळात शेतकऱ्यांना नवीन ओळपत्र देणार आहेत. आधार कार्डसारखेच हे ओळखपत्र असणार आहे. यासाठी लवकरच नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्याला आधारसारखा युनिक आयडी दिला जाणार आहे. या युनिक आयडीमुळे कृषी क्षेत्रातील विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. पिकांच्या किमान आधारभूत किंमत आणि किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजना यासाठी या ओळखपत्राची मदत होणार आहे.

सध्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यापूर्वी पडताळणी करावी लागते. यात केवळ वेळच नाही तर शेतकऱ्यांचा पैसा देखील खर्च होतोय. याशिवाय त्यांना त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन करणार आहे.

शेतकऱ्यांना ही ओळखपत्रे देण्यासाठी देशभरात शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच ही माहिती दिली. नोंदणी प्रक्रियेसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यावर काम सुरू होईल, अशी माहिती देखील देवेश चतुर्वेदी यांनी माध्यमांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Maharashtra Live News Update: पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळती

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी जाहीर, कधी, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT