Gokul Dudh Sangh Nivadnuk saam tv
Video

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Gokul Dudh Sangh Nivadnuk : गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. १८ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाणून घ्या...

Nandkumar Joshi

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर | साम टीव्ही

Gokul election nomination form submission dates 2026 : संपूर्ण राज्याचं आणि विशेषतः राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 18 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

15, 16, 17, 21 आणि 22 सप्टेंबर या पाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. गोकुळच्या निवडणुकीची घोषणा होताच कोल्हापूरच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रातील हालचालींना आता वेग येणार आहे. कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार? कोणाची कोणासोबत आघाडी होणार? आणि गोकुळवर पुन्हा कोणाचं वर्चस्व राहणार? याकडे आता संपूर्ण राज्यसह कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

  • एकूण २५ उमेदवार निवडून देणार

  • अर्ज भरण्यास १५ सप्टेंबरपासून सुरूवात होणार

  • अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - २२ सप्टेंबर

  • छाननी - २३ सप्टेंबर

  • वैध अर्ज - २४ सप्टेंबर

  • अर्ज माघार - २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर

  • या दरम्यान उमेदवारांची फायनल यादी प्रसिद्ध करणार आणि चिन्ह वाटप होणार

  • मतदान -१८ ऑक्टोबर

  • मतमोजणी -१९ ऑक्टोबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT