Nashik Saam TV
Video

Nashik : नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, गोदावरीला सहाव्या दिवशीही पूर परिस्थिती |VIDEO

Godavari River Flood Update : नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे. रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती आज सहाव्या दिवशीही कायम आहे. शहरातील प्रमुख घाट परिसरात पाण्याची पातळी सातत्यानं वाढत असून, धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे समजले जाणारे रामकुंड आणि गोदा घाट पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत.दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंत गोदावरीचं पाणी पोहोचल्यामुळे पूरस्थितीची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे. या भागातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून, काही मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

संतांच्या पालख्या, स्नान सोहळे आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे घाट आता जलमय झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. सुरक्षा उपाययोजना म्हणून घाट परिसरात नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दल तैनात आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यात न जाण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT