Work From Home  Saamtv
Video

Work From Home: खासगी वाहनं नको घरुन काम करा, इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर IEA च्या सूचना

Global Fuel Shortage: इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. या युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशामध्ये आयईएने मोठा निर्णय घेतला आहे.

Priya More

इराण विरुद्ध इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन संकट ओढावलंय. इंधनाचे दर गगनाला भिडल्यानं महागाईचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्यांना बसणार आहे. या परिस्थितीवर मात कऱण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था म्हणजेच IEAनं महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्यात आहेत. खासगी वाहनांसाठी सम विषम प्रणाली लागू करणं सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं आणि आठवड्यातून 3 दिवस वर्क फ्रॉम होम करणं अशा पर्यायांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाला तीन आठवडे होत आले. तरी देखील हे युद्ध अद्याप संपले नाही. या युद्धाचा फटका आता संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. युद्धामुळे पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT