Neet Exam Scam Saam Tv News
Video

Video: डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, वडिलांनी व्यक्त केला संताप!

Rachana Bhondave

Neet Exam Scam: यवतमाळच्या आर्णी शहरातील मधुरानगर येथिल रहिवासी CRPF मधून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र डांगे यांच्या मुलीने मे २०२४ ची वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीटची परिक्षा दिली. या परिक्षेमध्ये अनियमितता झाल्याची घटना घडली आणि त्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला. या महाघोटाळ्याचा मोठा फटका भुमिका राजेंद्र डांगे या विद्यार्थिनीला बसला. भुमिकाला पहिल्या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा ६४० गुण मिळाले होते व ऑल इंडिया रँक ११ हजारावर होती. या परिक्षेमध्ये अनियमितता झाली म्हणून काही विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात आली ही परिक्षा भुमिकाने दिली नाही. परंतु प्रवेशा करिता नव्याने गुणपत्रिका आणण्याचे सांगितल्यानंतर नव्याने गुणपत्रिका काढली त्यावेळेस ६४० वरून केवळ १७२ गुण मिळाल्याचे गुणपत्रिका मिळाली. ही गुणपत्रिका पाहताच भुमिका व तिच्या पालकांना धक्काच बसला. या गुणपत्रिकेत तिचे गुण इतके घटले की ती थेट ११ लाख रैंकवर फेकली गेली. मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले. हा प्रकार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न डांगे कुटुंबीयापुढे उभा ठाकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT