Ganpatipule Saam TV
Video

Ratnagiri : समुद्रातील अजस्त्र लाटांमुळे, गणपतीपुळे मंदिरात पाणी | VIDEO

Ganpatipule Mandir : समुद्राला उधाण आल्यामुळे पाणी मंदिरापर्यंत पोहोचले आहे. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांच पाणी शिरलेलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर परिसरात समुद्राने थैमान घातले आहे. समुद्राच्या भरतीचं पाणी थेट मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.लाटा उसळत असून, या प्रचंड लाटांमुळे मंदिराच्या आजूबाजूच्या सुरक्षा भिंतींना मोठा तडा गेला आहे. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांच पाणी शिरलेले आहे. मंदिराच्या प्रसाद रांगेच्या ठिकाणाच्या मंडपाचे सुध्दा लाटांमुळे नुकसान झाले आहे. या समुद्रफेनामुळे मंदिराजवळील अनेक लहानमोठ्या दुकाने आणि व्यावसायिक गाळे पाण्यात गेले आहेत. अजस्त्र लाटा गणपतीपुळे मंदिराच्या जवळच्या गेटपर्यंत आल्या आहेत. समुद्राला उधाण आल्यामुळे पाणी मंदिरापर्यंत पोहोचले असून, कोकण किनारपट्टी भागात पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver Scheme : दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या सेनगाव येथील शासकीय गोदामात निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा

SSC-HSC Exam: मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Women Cancer Symptoms: ‘वय वाढतंय म्हणून...’ महिलांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय गंभीर आजाराचे संकेत

Heart - Diabetes : द्राक्षांचा 'हा' प्रकार आरोग्यासाठी वरदान! हृदय राहील निरोगी अन् शुगर कंट्रोलमध्ये

SCROLL FOR NEXT