Pune Police announce road closures and traffic diversions for Ganesh Visarjan 2025 Saam Tv
Video

Pune News: गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पुण्यातील "हे" रस्ते राहणार बंद | VIDEO

Ganesh Visarjan 2025 Pune Traffic Diversions: पुण्यातील गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. पुणे पोलिसांनी वाहतूक बदल आणि नो पार्किंग झोनची माहिती जाहीर केली आहे.

Omkar Sonawane

येत्या शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पुण्यातील बहुतांश सर्वच महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्त पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येतं. यामुळे वाहनचालकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या शनिवारी सकाळी ९.३० वाजता पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होत असल्यामुळे मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे.

*विसर्जन सोहळ्यानिमित्त कुठले रस्ते राहणार बंद*

*लक्ष्मी रोड: सकाळी ७ पासून मिरवणूक संपेपर्यंत*

*टिळक रोड: सकाळी ९ पासून मिरवणूक संपेपर्यंत*

*केळकर रोड: सकाळी १० पासून मिरवणूक संपेपर्यंत*

*कुमठेकर रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत*

*शिवाजी रोड: सकाळी ७ पासून मिरवणूक संपेपर्यंत*

गणेश रोड: सकाळी १० पासून मिरवणूक संपेपर्यंत

बाजीराव रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत

शास्त्री रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत

जे एम रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

कर्वे रोड: सायंकाळी ४ पासून पासून मिरवणूक संपेपर्यंत

फर्ग्युसन रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

पुणे सातारा रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

पुणे सोलापूर रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

*पुण्यातील या रस्त्यांवर असणार नो पार्किंग*

लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक

केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक

कुमठेकर रोड: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक

टिळक रोड: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक

शास्त्री रोड: सेनादत्त पोलिस चौकी ते अलका टॉकीज चौक

कर्वे रोड: नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT