विकास मिरगणे, साम टीव्ही | पनवेल
सीएसटीएल–जेएनपीटी मार्गावर धावणाऱ्या मालगाडीचे डबे रुळांवरून घसरले. आज, गुरुवारी दुपारी साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास नवीन पनवेल रेल्वे पुलाखाली ही घटना घडली. पनवेल रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच ही घटना घडल्यानं काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, जेएनपीटीकडे जाणारी ही मालगाडी पुलाखालील वळणावर येताच अचानक डबे रुळांवरून घसरले. सुदैवानं मोठा अपघात टळला असला, तरी काही डब्यांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे सीएसटीएल–जेएनपीटी मार्गावरील मालवाहतूक काही काळ प्रभावित झाली. जवळच असलेल्या पनवेल स्थानक परिसरात पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. या मार्गावरून प्रवासी गाड्या धावत नसल्याने प्रवाशांना त्रास झाला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.