बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR प्रत साम टीव्हीच्या हाती लागली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी झटापटीत आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे. अक्षय शिंदे याच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.