Farmers in Nanded risk their lives crossing floodwaters with bullock carts due to absence of a bridge." Saam Tv
Video

Nanded News: छाती इतक्या पाण्यातून बैलगाडीतून जीवघेणा प्रवास, नांदेडमध्ये शेतकर्‍यांवर अस्मानी संकट, पाहा व्हिडिओ

Life-Threatening River Crossing Journey: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या नदीवर पूल नसल्याने बैलगाडीसह शेतकरी जीव धोक्यात घालून नदी पार करत आहेत.

Omkar Sonawane

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले पूरग्रस्त झाले आहेत.

धानोरा मक्ता ते गांधीनगर नदीवर पूल नसल्याने शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

शेतकरी बैलगाडीसह नदी पार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनेक वर्षांपासून पूल उभारणीची मागणी असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला मोठा पूर आलाय. नांदेडच्या लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ते गांधीनगर या गावच्या नदीला देखील मोठा पूर आला आहे. या नदीवर पूल नसल्याने या पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

या नदीच्या पुरातून शेतकरी बैलगाड्यांसह आपला जीव धोक्यात घालून नदी पार करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धानोरा मक्ता ते गांधीनगर जाण्यासाठी पावसाळ्यात या नदीच्या पाण्यातून शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. मागील अनेक वर्षा पासून या नदीवर पूल उभारण्याची मागणी असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT