Crop Insurance VIDEO: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा Saam TV
Video

Crop Insurance VIDEO: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिक विमा कंपन्यांकडून थट्टा

Crop Insurance News: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पिक विम्याचे दावे कंपन्यांनी फेटाळले, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून कशी थट्टा केली जात आहे हे आठवडाभरापूर्वीच साम टीव्हीने समोर आणले होते. आता तर क्लेम करूनही मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या विम्याची रक्कम दिली जात नसल्याचं समोर आलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील एकट्या कन्नड तालुक्यात गतवर्षी खरीप हंगामात विमा मंजूर झालेल्या १ लाख २३ हजार ६१९ पैकी ५२ हजार ५१९ शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. मात्र, ७१ हजार १०० शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे दावे काहीही कारण न सांगता विमा कंपनीने फेटाळले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा ६ लाखांच्या पुढे असल्याचं सांगितलं जात आहे.

एकाच गावातील एकाच कुटुंबात एका भावाला विम्याची रक्कम मिळाली तर दुसऱ्या भावाला विम्याची रक्कम मिळाली नाही. शिवार एकच असून, नुकसानाचे कारणदेखील सारखेच असताना काही शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे तर काही शेतकऱ्यांना त्याच कारणासाठी विमा नाकारण्यात आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील १ लाख ५३ हजार ६७८ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन २०२३ -२४ या वर्षाच्या पीकविमाम्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३० हजार ९ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारच नोंदविली नाही. त्यामुळे पिकांचा विमा काढूनही त्यांना विमा मिळाला नाही. तर १ लाख २३ हजार ६१९ शेतकऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विमा कंपनीच्या १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवली. तक्रार नोंदविण्यासाठी हा एकच नंबर असल्याने अनेकांना तक्रार नोंदविताना अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी तक्रार नोंदविल्याची नोंद विमा कंपनीकडे झाली. त्यातील ५२ हजार ५१९ शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी ३४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. मात्र, उर्वरित ७१ हजार १०० शेतकऱ्यांचे दावे कुठलेही कारण न सांगता कंपनीमार्फत फेटाळण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT