Local women confront a woman accused of fake voting at a polling booth in Dharmabad, Nanded. Saam Tv
Video

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

Fake Voting Incident In Dharmabad Nanded: नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाच्या दिवशी बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला. एका महिलेला रंगेहाथ पकडल्यानंतर मतदान केंद्रावर मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.

Omkar Sonawane

नांदेड येथील धर्माबाद शहरात मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. एका मतदान केंद्रावर एका महिलेला बोगस मतदान करताना स्थानिक महिलांनी रंगेहाथ पकडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

तेलंगणा राज्यातील मतदारांना धर्माबादमध्ये आणून बोगस मतदान केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर काही महिलांनी संबंधित महिलेला अडवले. यावेळी ती बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत स्थानिक महिला उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तिला जाब विचारला. या प्रकारानंतर परिस्थिती चिघळली असून बोगस मतदान करणाऱ्या महिलेला स्थानिक महिला उमेदवारांकडून चोप दिला. घटनेनंतर मतदान केंद्र परिसरात बोगस मतदारांची एकच पळापळ झाल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurkuri Bhendi Recipe : लहान मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादला विजयाची हॅट्रिक मिळवून देऊनही इशानचं कर्णधारपद जाणार? काय आहे कारण?

Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT