A massive ash plume rises over Ethiopia’s Highley Gubbi region after a powerful volcanic eruption, spreading thousands of kilometers across continents. Saam Tv
Video

12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

Impact Of Ethiopia Volcano On India Weather: इथिओपियातील हायली गुब्बी परिसरात झालेल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे प्रचंड प्रमाणात राखेचे ढग तयार झाले असून हे ढग ओमान, येमेनमार्गे भारतापर्यंत पोहोचले आहेत.

Omkar Sonawane

इथिओपियातील हायली गुब्बी परिसरात झालेला ज्वालामुखी उद्रेक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या उद्रेकानंतर इथिओपियाबरोबरच ओमान आणि येमेन येथील हवामानावरही त्याचे मोठे परिणाम दिसून आले आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख, सल्फर डाय ऑक्साईड आणि सूक्ष्म काचेचे तुकडे यांच्या प्रचंड प्रमाणातील ढगांची निर्मिती झाली असून हे ढग शेकडो किलोमीटरपर्यंत पसरू लागले आहेत. इथिओपियातून निघालेले हे ढग येमेनमार्गे गुजरातपर्यंत पोहोचले असून संध्याकाळपर्यंत ते चीनच्या दिशेने सरकतील अशी माहिती समोर आली आहे. या बदललेल्या वातावरणामुळे विमान वाहतुकीवर विशेषतः मोठा परिणाम होत आहे.

इथिओपियात नेमकं घडलं काय?

रविवारी इथिओपियाच्या पूर्वेकडील भागात अचानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. तब्बल १० हजार वर्षांनंतर हा ज्वालामुखी सक्रिय झाल्याचे सांगितले जाते. उद्रेकाची तीव्रता एवढी मोठी होती की राख आणि खडीचे लोळ १४ ते १५ किलोमीटर उंच आकाशात उडाले. सध्या उद्रेकाचं प्रमाण कमी होत असलं तरी लाव्ह्यासोबत वर गेलेल्या राखेच्या ढगांचा आंतरराष्ट्रीय परिणाम स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरमुळे 9 वरहांचा मृत्यू

Chhota Kashmir Mumbai: मुंबईतच वसलंय छोटा काश्मीर, हिवाळ्यात पाहायला मिळेल धुकं अन् नयनरम्य निसर्ग

तुम्हें प्रेग्नेंट करना चाहता हूं...; काँग्रेस आमदारावर लैंगिक छळाचे आरोप, ऑडिओ क्लिप अन् चॅट व्हायरल

IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करा, शरद पवार गटाची मागणी, मराठी अस्मितेसाठी नामांतर आवश्यक|VIDEO

SCROLL FOR NEXT