Eknath Shinde Gujarati speech at Vadnagar Seva Sankalp Abhiyan 
Video

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

Eknath Shinde Gujarati Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त वडनगरमध्ये आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजराती भाषेतून भाषणाची सुरुवात केली.

Bharat Jadhav

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट गुजराती भाषेमधून भाषण केलं. मात्र शिंदेंच्या या भाषणावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलीय.

वडनगरच्या पवित्र भूमीत येणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत शिंदे यांनी या भूमीला नमन केले. “वडनगरच्या मातीतून उमटलेला एका बालकाचा आवाज आज देशातच नव्हे, तर जगभर घुमत आहे,” असे ते म्हणाले. वडनगर ते वाराणसी ही यात्रा केवळ प्रवास नसून सेवेपासून समर्पण, संकल्पापासून परिवर्तन आणि परिवर्तनापासून विकसित भारताकडे जाणारी यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात पदे व जबाबदाऱ्या बदलल्या; मात्र सेवेचा संकल्प बदलला नाही, असे शिंदे म्हणाले. एनडीए बैठकीत अमित शाह यांनी यंदाचा जन्मदिन व्यापक स्वरूपात साजरा करून सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले होते, त्याच भावनेतून अभियान सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patekar: नाना पाटेकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर! मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून २ दिवसासाठी अलर्ट

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

SCROLL FOR NEXT