Shinde Shivsena Politics saam tv
Video

Maharashtra Politics : शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या हालचाली; नेत्यांसोबतच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर

Shinde Holds Online Meet with Party Leaders Signals Major Organizational Changes : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसतंय. राज्यातील नेते-पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी अनेक महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

Saam Tv

बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच संपर्कप्रमुखांच्या नावांची घोषणा केली होती. शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. ही २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिंदे यांनी नुकतीच पक्षाच्या सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्क प्रमुख, लोकसभा संपर्क प्रमुख यांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत नेमकं काय झालं, त्याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे.

'काम केलं नाही तर डच्चू'

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख, लोकसभा संपर्कप्रमुखांच्या बैठकीत संबंधितांना महत्वाच्या सूचना केल्या. मंत्री-खासदार असल्याचं विसरा आणि कार्यकर्ता म्हणून काम करा, असं त्यांनी सांगितलं. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन बैठका घेण्याच्या सूचनाही केल्या. जे काम करणार नाहीत, त्यांना ताबडतोब डच्चू देणार असल्याचा इशाराही शिंदेंनी दिल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC खासदारांचं विलिनीकरण; शिंदेसेनेत टेन्शन, स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke attacked : अभिजीत दिपकेंना मारहाण कोणी केली? हल्लेखोर कोण?

kalayn : 'कल्याणच्या रस्त्यावरून श्रीकांत शिंदेंना फिरवा'; केडीएमसी महासभेत ठाकरे गट-शिंदे गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

hingoli earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा हादरा; दोन महिन्यात ४ वेळा भूकंप

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काही तरी मोठं घडणार, महायुतीत गुप्त बैठका सुरु|VIDEO

SCROLL FOR NEXT