muktainagar to jalgaon election result saam tv
Video

Saam Maha Exit Poll : मुक्ताईनगरचा संभाव्य नगराध्यक्ष कोण? भाजपची सत्ता की एकनाथ शिंदे मारणार बाजी?

एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना बाजी मारेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nandkumar Joshi

संजय महाजन, मुक्ताईनगर | जळगाव

मुक्ताईनगर म्हणजे एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला! तिथल्याच भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्रात राज्यमंत्री आहेत. पण मुक्ताईनगरच्या पालिका निवडणुकीत हा बालेकिल्ला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भेदून काढल्याचं चित्र आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या संजना पाटील या संभाव्य नगराध्यक्षा होण्याची शक्यता साम टीव्हीने केलेल्या महाएक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे.

साम टीव्ही महाएक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मुक्ताईनगर पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे १९ नगरसेवक निवडून येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार आहे. येथील आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे असून, संजना पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपनेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला होता. त्यामुळं ही लढत अधिक रंगतदार झाल्याचं दिसून आलं. भाजपनेही इथं ताकद लावली होती. तर शिवसेनेचे आमदार असल्याने चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कडक "फुलचंद" खाताय? पानांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टपऱ्यांवर पुणे पोलिसांचा वॉच

Eknath Shinde : अन् एकनाथ शिंदे ठाकरेंना सर्वांसमोरच म्हणाले साहेब, पाहा व्हिडिओ

Kharat case : विकृत खरातचा आणखी एक कारनामा समोर, बडे उद्योगपती अडकले हनी ट्रॅपमध्ये?

Mumbai Fire : मुंबईत पॉश एरियात आगीचा भडका, २२ मजली इमारतीत भीषण आग

Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री?

SCROLL FOR NEXT