Eknath Shinde SaamTv
Video

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उदारपणा; ज्या कर्जाच्या डोंगरामुळे शिरीष महाराजांनी जीवन संपवलं, ते कर्ज शिंदेंनी फेडलं | Video

Shirish Maharaj Death News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उदार मनाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. शिरीष महाराज मोरे यांनी ज्या कारणाने आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उतरवलं आहे.

Saam Tv

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उदार मनाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आर्थिक विवंचनेतून संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबावरती दु:खाचा डोंगर पसरला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेच ३२ लाखांचं कर्ज झटक्यात फेडलं आहे. संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं आहे. आमदार विजय शिवतारे यांनी शिरीष महाराज यांच्या कुटुंबाचं सांत्वन करताना एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली ३२ लाखांची रक्कम देऊ केली.

देहू येथील राहात्या घरी ५ फेब्रुवारीला शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या या टोकाच्या पाऊल उचलण्याने वारकरी संप्रदयावर शोककळा पसरली होती. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच कर्जाची ३२ लाखांची रक्कम देऊन एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं, त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या उदार मनाची प्रचिती सर्वांना आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT