sangli news  saam tv
Video

Maharashtra Politics: डबल महाराष्ट्र केसरी पहिलवानला शिवसेनेची खुली ऑफर, राज्यात राजकीय घडामोडींना वेग? VIDEO

Double Maharashtra Kesari political shift : अनेक दिवसांपासून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाला सोडचिठी देणार अशी चर्चा सुरु आहे, याबाबत आज त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

Omkar Sonawane

सांगली: डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मागील दोन दिवसाआधी सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी चंद्रहार पाटलांकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा देखील भेट देण्यात आली होती.

चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या भाळवणी गावात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम,हा चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मानले जात होते. यानंतर आज चंद्रहार पाटील यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच आगामी काळात डबल केसरी पहिलवान कोणत्या पक्षाची गदा हातात घेता हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT