Election officials and police reach the spot after alleged cash distribution during the Dombivli election campaign. Saam Tv
Video

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

Cash Distribution Allegation During Dombivli Election: डोंबिवलीत निवडणूक प्रचारादरम्यान पैशांचे वाटप केल्याचा गंभीर आरोप भाजपवर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला असून, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.

Omkar Sonawane

डोंबिवली : डोंबिवलीत निवडणूक प्रचारादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन भागात भाजपकडून नागरिकांच्या घरी तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेदरम्यान शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली आणि प्रकार उघडकीस आणला.

घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, पैशांचे वाटप नेमके कोणी आणि कुणाच्या सांगण्यावरून केले, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप भाजपवर होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT