पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालय वादात सापडलं होतं. आता ससून रुग्णालयातला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेवारस रुग्णांना डॉक्टरच निर्जन स्थळी सोडून येतात अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी ही घटना उघडकीस आणली आहे. डॉ. आदी अशा रुग्णांना निर्जन स्थळी सोडून येतात. यासाठी त्यांचा नेहमीचा एक रिक्षावालाही आहे. हा रिक्षावाला ५०० रुपये घेऊन एका निर्जन ठिकाणी या रुग्णांना सोडून येतो. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.