Divya Deshmukh Saam TV
Video

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Divya Deshmukh : फिडे महिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून भारताचं नाव उज्ज्वल करणारी दिव्या देशमुख आज नागपूर विमानतळावर पोहोचली. दिव्या देशमुखच स्वागत ढोल ताशाचा गजरात केलं गेलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख हि फिडे महिला विश्व चॅम्पियन बनल्यानंतर नागपूर विमानतळावर पोहचली.नागपूरकरांनी दिव्या देशमुखच स्वागत ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत शानदार स्वागत करण्यात आलं.नागपूर विमानतळावर चेस फेडरेशन आणि नागरिकांनी दिव्याच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. शाळकरी बुद्धिबळपटूंनीही दिव्याचं जोरदार स्वागत केलं. दिव्याचे वडील आणि आजी देखील यावेळी उपस्थित होते. '

सोमवारी बाटुमी येथे पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिव्यानं भारताच्या आणखी एक दिग्गज खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरातून दिव्या देशमुखवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दिव्या देशमुख ही भारतातील बुद्धिबळपटूंपैकी एक असून, तिने अल्पवयातच आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

Farah Khan: तुम्ही आणि सलमान खान एक सारखे...; फराह खानने का केली बाबा रामदेवची सलमान खानशी तुलना

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील शिंदेंना कोर्टात चक्कर, रूग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार

Causes of high blood sugar: फक्त साखर खाल्यानेच ब्लड शुगर वाढत नाही, तज्ज्ञांनी दिली सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

India Tourism : चेरापुंजी नाही तर 'या' ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस

SCROLL FOR NEXT