Dilip Walse Patil Saam Tv
Video

Dilip Walse Patil: तरुणाई गुन्हेगारीकडे वळतेय त्याला आम्ही राजकीय लोक त्यात भर घालतो, दिलीप वळसे पाटील यांची कबुली, VIDEO

Former Home Minister Slams Own Government : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणातून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. तसेच ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेचे अनेक गुन्हे समोर आले. हा खोक्या देखील भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. अशातच बीड मधील एकेक गुन्हेगारी समोर येत असतानाच राज्याचे माजी गृहमंत्री तसेच महायुतीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या सरकारमधील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. वळसे पाटील म्हणाले, खेड्यापाड्यासह शहरात पिस्तूल कोयत्याने हल्ले होत असताना ही प्रवृत्ती कशी वाढते, असा मला प्रश्न पडलाय तरुणाईच्या हाताला काम नाही, नोकरी नाही म्हणून लग्न देखील जमत नाही. यातून तरुणाई नैराश्यात गेली आहे. आणि हीच तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. आणि त्यामध्ये आम्ही राजकीय लोक भर घालत आहोत अशी कबुलीच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणाच्या वेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

SCROLL FOR NEXT