Social activists dressed as Lord Ganesha protest against pothole-ridden roads in Dhule during Ganeshotsav. Saam Tv
Video

रस्त्याच्या मधोमध अवतरले गणपती, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

Social Activists As Lord Ganesha: धुळे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाचा वेश धारण करून पालिका प्रशासनाविरोधात अनोखा निषेध नोंदवला.

Omkar Sonawane

धुळ्यात गणेशोत्सवानिमित्त मार्गस्थ होणाऱ्या मिरवणुकांच्या मार्गामध्ये रस्त्यांमध्ये पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर गणपती बाप्पा अवतरले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाचा वेश परिधान करून धुळ्याच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध केला आहे.

आज झालेल्या जोरदार पावसानंतर खड्डेमय रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच कसरत बघावयास मिळत आहे, गेल्या काही दिवसांपासून विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धुळे शहरातील रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे पालिका प्रशासनातर्फे बुजवण्यात यावे अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे, परंतु याकडे पालिका प्रशासन सर्रासपणे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्यामुळे आज अक्षरशः रस्त्यावरती सामाजिक कार्यकर्त्यांनी गणपती उतरवत पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT