Dhangar Reservation News SaamTv
Video

Ahemadnagar News : धनगर समाज आंदोलकांची जलसमाधी?; बघा काय आहे प्रकरण

Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Saam Tv

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अहमदनगर येथे सकल धनगर समाजाच्यावतीने राज्यव्यापी आमरण उपोषण सुरु आहे. अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या 9 दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून सरकार दखल घेत नसल्याने जलसमाधी घेण्याचा इशाराही या आंदोलकांनी दिला होता. गुरुवारी या उपोषणामधील दोन तरुण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे अशी या दोन्ही धनगर आंदोलक तरुणांची नावे आहेत. दोघेही काही तासांपासून गायब असून आम्ही जलसमाधी घेत आहोत, यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, अशा आशयाची चिठ्ठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदिकाठी सापडली आहे. तसेच गोदावरी पुलावर त्यांच्या चपलाही आढळून आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही तरुणांचे मोबाईल फोनही बंद लागत असल्याने त्यांनी खरंच नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेने आंदोलकांसह, परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस आणि नागरिक दोघांचाही शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT