Beed News. Saam Tv
Video

Beed News : बीड सरपंच हत्या प्रकरण; कराड यांच्याबद्दल धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले... |VIDEO

Dhananjay Munde Statement : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

Saam Tv

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड यांच्याबाबत धनंजय मुंडे यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. कराड हे माझे निकटवर्तीय असल्याची कबुलीच मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड यांना पाठीशी घालण्यामागे बीडच्या मंत्र्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी काल विधान परिषदेत केला आणि आता मुंडे यांनी कराड निकटवर्तीय असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे या आरोपांना पुष्टी मिळण्याची शक्यता आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस झाले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबद्दल बोलताना काल बीडच्या मंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे असा आरोपही केला. त्यांनंतर आज धनंजय मुंडे यांनी कराड हे माझे निकटवर्तीय असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT