First Devgad Hapus mango box sold for Rs 36000 : कोकणचा राजा म्हणजे हापूस आंबा. आता हापूस म्हटला तर तोंडाला पाणी सुटणारच ना! पण याच हापूसला मिळालेला दर बघून कदाचित तोंडचं पाणीच पळेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये हंगामापूर्वी पोहोचलेल्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला विक्रमी दर मिळाला आहे.
हापूस आंब्याची पहिली पेटी हंगामाआधीच वाशी मार्केटला पोहोचली. देवगडच्या गिर्ये रामेश्वर येथील प्रगतशील बागायतदार मिलेश बांदकर यांनी ऑक्टोबर महिन्यातच हापूस आंब्याचे उत्पादन घेत नवा प्रयोग यशस्वी केला. संकष्टीच्या मुहूर्तावर काढलेली ही पेटी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणण्यात आली. साडेसहा डझन आंबे असलेल्या या पेटीला वाशी मार्केटमध्ये तब्बल 36 हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला. विशेष म्हणजे, दिवाळी पाडव्याला आणखी सहा ते सात पेट्या बाजारात पाठवण्याचे नियोजन असल्याचे बागायतदारांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.