Maharashtra leaders Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, and Sanjay Raut spotted traveling together on a flight to Nagpur, sparking political speculation. saam tv
Video

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एकाच विमानाने नागपूरला रवाना; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानाने नागपूरला रवाना झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रवासामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच विमानाने मुंबईहून नागपूरला रवाना झाले आहेत. यावेळी विमानात आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते.

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेत घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार तोफ डागली. यावरून राज्याचे राजकारण तापले असतानाच हा एकत्र प्रवास दिसून आल्याने पडद्यामागे काही राजकीय घडामोडी घडता आहे का? अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे असे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Bandh : २ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक; महाराष्ट्रातही पडणार पडसाद, बड्या नेत्याची घोषणा

तिन्ही ठाकरे आंदोलनाच्या मैदानात; शिवसेना भवनाबाहेर जोरदार गोंधळ, आदित ठाकरेंनी अडवली पोलिसांची व्हॅन

Maharashtra News Live Update: आदित्य - तेजस- अमित ठाकरेंनी पोलिस व्हॅन अडवली

Saasre Bapre: एक बाप… आणि एक बाप लव्हस्टोरी! भरत जाधवचा 'सासरे बापरे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pimpri-Chinchwad Forts : वीकेंडला किल्ले फिरायचंय? पिंपरी-चिंचवडजवळ आहेत 'हे' ७ ऐतिहासिक गड-किल्ले

SCROLL FOR NEXT