CM Devendra Fadnavis addressing a massive crowd in Gadchiroli during his development-focused election rally. Saam Tv
Video

माझ्या लाडक्या बहीणींनो… योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण! फडणवीस नेमके काय म्हणाले? VIDEO

Ladki Bahin Yojana: गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहील अशी हमी दिली. 130 कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पासह मोठ्या विकासकामांची घोषणा करत गडचिरोली टाटानगरपेक्षा मोठं होईल असा दावा त्यांनी केला.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील सभा घेत विकासाच्या आश्वासनांचा पाऊस पाडला. मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत जितक्या वेळा सगळे मुख्यमंत्री मिळून गडचिरोलीला आले नाहीत, त्यापेक्षा जास्त वेळा मी स्वतः येथे आलो आहे. गडचिरोलीला अनेक वर्षे हिनवलं गेलं. परंतु आता महाराष्ट्रात पहिला प्रगत जिल्हा म्हणून गडचिरोली उभा राहत आहे. मागील कार्यकाळात 700 ते 800 कोटी रुपयांची कामे गडचिरोलीसाठी करण्यात आली. मी कुणावर आरोप करत नाही कुणाची उणीव काढत नाही. मला सकारात्मक पद्धतीने मत मागायचे आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाच्या GDP मधील 65% योगदान या भागातून येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहर बदलण्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी मोठा निधी देण्यात आला असून आता 130 कोटींची नवी पाणीपुरवठा योजना आपला उमेदवार निवडून आल्यानंतर मंजूर केली जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत आहे. सर्व प्रकारच्या अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी नियम करण्यात आले आहेत. 3 लाख कोटींची गुंतवणूक गडचिरोलीत येत असून गडचिरोली टाटानगरपेक्षाही मोठा होईल असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करत आधुनिक गडचिरोली उभारण्याचा आमचा संकल्प आहे. आरोग्य सुविधा मजबूत करण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की 2400 रोगांवर मोफत उपचार मिळणार आहेत. भविष्यात शहरात आउटर रिंग रोड, तसेच विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार आहे. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार गडचिरोलीला बनवायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. काही लोक गडचिरोली मागे राहावे यासाठी लोकांना भडकवतात अशी टीका देखील त्यांनी केली.

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहण्याची हमी देत म्हटले, जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

Vastu Tips For Water: किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पाण्याचे भांडे, रात्रीतून बदलेल तुमचं नशीब

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

बनावट आधारकार्डावर बालविवाहाचा प्रयत्न फसला; मांडव सजला, पाहुणे जमले, तेवढ्यात 'चाईल्डलाईन'ने असा उधळला डाव

भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये मोठं घबाड, SIT च्या हाती लागले महत्वाचे पुरावे, VIDEO

SCROLL FOR NEXT