CM Devendra Fadnavis being tied Rakhi by sisters during the Mumbai celebration. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: जन्मभर या प्रेमातच राहायचं आहे – देवेंद्र फडणवीस भावनिक|VIDEO

I Want To Stay In This Love Forever," Says CM Devendra Fadnavis: मुंबईत झालेल्या राखी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक भावना व्यक्त केल्या. ३६ लाखांहून अधिक बहिणींनी राखी पाठवली असून, “जन्मभर या प्रेमातच राहायचं आहे” असे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

मुंबईत भाजपातर्फे राखी कार्यक्रमाचे आयोजन झाले.

३६ लाख ७८ हजार बहिणींनी राखी पाठवली.

फडणवीस यांनी “जन्मभर या प्रेमातच राहायचं आहे” असे भावनिक वक्तव्य केले.

राखीला धर्म, जात किंवा पंथ नसून ती फक्त प्रेमाचा धागा आहे असे त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय जनता पक्षातर्फे आज मुंबई येथे राखी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करताना म्हणाले, आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि भावनिक आहे. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांनी उपस्थिती लावत देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. यावेळी फडणवीस म्हणाले, आता पर्यंत 36 लाख 78 हजार बहीणींची राखी ही माझ्या पर्यंत पोहोचली आहे. तर काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना लिहिल्या आहेत, ते मी स्वीकारतो आणि जन्मभर मला या प्रेमातच राहायचे आहे. मला या प्रेमाच उतराही कधीच व्हायच नाही हे देखील त्यांच्या पर्यंत पोहोचवायचे आहे अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुढे फडणवीस म्हणाले, यामधील कुठलीही एक राखी उचलली तर त्या रखीची जात काय आहे? त्याचा धर्म काय आहे? त्याचा पंथ काय आहे? त्याची भाषा काय आहे? या प्रत्येक राखीमध्ये फक्त प्रेम आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

Silent Divorce: सायलेंट डिव्होर्स म्हणजे काय? घटस्फोटाआधीच तुटतं नातं; सायलेंट डिव्होर्सचे संकेत कोणते?

SCROLL FOR NEXT