Maharashtra CM Devendra Fadnavis साम टीव्ही मराठी
Video

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी! इंधन वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं खास पाऊल

Maharashtra CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी अधिकृत ताफा टाळत बुलेटवरून विधानभवनात एन्ट्री केली. आशिष शेलारही त्यांच्या सोबत दुचाकीवर दिसले.

Namdeo Kumbhar

CM Devendra Fadnavis Bike Ride news Video : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी विधानभवनात चक्क बुलेटवरून एन्ट्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर फडणवीस यांनी आपला ताफ्यातील वाहनांना घेऊन न जाता बुलेटवरून जाण्याचा निर्णय घेतला. आज मंत्रिमंडळाची बैठक होणर आहे, त्यासाठी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार दुचाकीवरून मंत्रालयात दाखल झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बुलेट चालवत विधानभवन गाठले. त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार हे देखील पाठीमागे बसलेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलिसांचा ताफा आणि सुरक्षा रक्षकही गाड्यांऐवजी बाईकवरूनच विधानभवन परिसरात दाखल झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि जनतेला इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pelvic floor exercises: प्रसूतीनंतर लघवीवर नियंत्रण राहत नाही? गर्भावस्थेत केलेला हा सोपा व्यायाम ठरू शकतो फायदेशीर

Maharashtra News Live Update: नागपूर- गोधनी गॅस गळती घटनेच्या प्रकरणाची चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना

भाजप आमदाराच्या मुलीनं महिला PSI च्या कानशिलात लगावली, मंदिरात हायव्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल

Blue Tea for Acidity and Diabetes: ॲसिडिटी आणि मधुमेहासाठी ब्ल्यू टी फायदेशीर? जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

Heart Attack : कोलेस्ट्रॉल नॉर्मल असूनही येतोय हार्ट अटॅक, 'हे' छोटे कारण ठरतेय धोकादायक

SCROLL FOR NEXT