Devendra Fadnavis News SaamTv
Video

Devendra Fadnavis : फडणवीसांनी घेतलं सिद्धिविनायक आणि मुंबदेवीचं दर्शन | VIDEO

Mahayuti Oath Taking Ceremony : महायुती सरकारने काल सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आज संध्याकाळी आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबईदेवीच्या मंदिरात दर्शन घेतलं.

Saam Tv

दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात जात आज शपथविधी सोहळ्यापूर्वी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले. शपथविधीपूर्वी फडणवीस यांनी श्रीगणरायाचरणी तसंच मुंबईदेवीच्या चरणी प्रार्थना केलेली दिसली. यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाच्या 13 दिवसांनंतर आज नवीन सरकार स्थापन होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आज सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर राज्यात गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींना देखील या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT