Deputy CM Sunetra Pawar  Saam Tv
Video

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राजकीय दौऱ्याची सुरूवात, साताऱ्यात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी नतमस्तक

Deputy CM Sunetra Pawar In Satara: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराड येथील प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देत अभिवादन केले. याद्वारे त्यांनी राजकीय दौऱ्याची सुरूवात केली.

Priya More

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. राजकारणात आणि समाजकारणात यशवंत विचार रुजवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पवार कुटुंबाची परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. अभिवादनानंतर त्या स्वर्गीय अजित पवार यांचे अंगरक्षक असलेले विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विदिप जाधव यांच्या सातारा जिल्हातील गावाला भेट देणार आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गिय अजित पवार यांचे आणि स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT