दूध पावडर आयातीचा निर्णय केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. आयात शुल्क कमी करुन १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. या निर्णयाला अनेक ठिकाणी तीव्र विरोध करण्यात आला होता. या संदर्भातील माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. राज्यात सुमारे तीन लाख किलो दूध पावडर शिल्लक आहे. केंद्र सरकारने निर्यात किंवा अनुदान देण्याएवजी दूध पावडर आयात करण्यावर भर दिला होता. त्यामुळे राज्यभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनं केली जात होती. त्यामुळे दुधाचा दर देखील घसरला होता, त्यामुळे केंद्राने तातडीने निर्णय घेत दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.