Afghanistan snowfall disaster Saam TV Marathi
Video

Snowfall : निसर्गाचा प्रकोप! भीषण बर्फवृष्टीमुळे ६१ जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

Afghanistan snowfall : अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि भीषण बर्फवृष्टीमुळे ६१ जणांचा मृत्यू झाला असून ११० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ४५० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

Namdeo Kumbhar

Afghanistan snowfall disaster : अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि भीषण हिमवृष्टीने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. कडाक्याची थंडी आणि सततच्या बर्फवृष्टीमुळे देशातील ४५० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अनेक महत्त्वाचे महामार्ग बर्फाखाली गाडले गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी काबूलचा इतर भागांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असले तरी, प्रतिकूल हवामानामुळे अडथळे येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर

Maharashtra Live News Update: औरंगजेबाच्या क्रूरतेला गुरु गोविंदसिंग घाबरले नाही- देवेंद्र फडणवीस

चादर आणि सतरंजी आणून द्या; शिंदेंच्या शिवसैनिकांनी माजी आमदाराला घेरलं, नेमकं काय घडलं?

Chocolate Pudding: मुलांसाठी बनवा घरच्याघरी चॉकलेट ब्रेड कॅरॅमल पुडिंग, वाचा सोपी अन् झटपट रेसिपी

Hrithik Roshan: चेहरा पडलेला,हातात वॉकिंग स्टिक; हृतिक रोशनला झाली गंभीर दुखापत, व्हिडिओपाहून चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT