Veteran politician Dattaji Meghe, known for his significant contribution to Maharashtra politics and education sector, passes away at 90. Saam TV
Video

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Former MP Dattaji Meghe Dies in Nagpur at 90: भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले. विदर्भातील प्रभावी नेता, माजी खासदार आणि शिक्षणतज्ञ म्हणून त्यांनी मोठा ठसा उमटवला होता.

Omkar Sonawane

चेतन व्यास, साम टीव्ही

भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विदर्भातील ज्येष्ठ नेते राजकारणी, शिक्षणतज्ञ आणि समाजसेवक तथा माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी (दि.22) नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपमध्ये राहून चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच विधानपरिषद आमदार म्हणून ही त्यांनी काम केले आहे. त्यांचे पुत्र समीर मेघे हे आमदार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT