विधानसभा प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराची प्रचार सभा गावकऱ्यांनी उधळून लावली आहे. नायगाव विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला असून यावेळी सभेच्या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला होता.
नांदेडच्या नायगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षचे आमदार राजेश पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा गावकऱ्यांनी उधळून लावली. नायगाव तालुक्यातील सोमठाना येथे काल रात्री ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार उपस्थित होत्या. काही वेळात आमदार पवार देखील येणार होते. मात्र त्यापूर्वीच गावकऱ्यांनी ही सभा उधळून लावली. यावेळी सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. मात्र सभा का उधळून लावली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.