Dilip Mane Solapur News SaamTv
Video

Dilip Mane News : उमेदवारी दिली, पण ऐनवेळी एबी फॉर्म नाकारला, कॉंग्रेसच्या भूमिकेवर दिलीप मानेंना अश्रू अनावर | Video

Solapur Congress News : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र आज वेळेवर एबी फॉर्म नाकारला आहे. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Saam Tv

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी घोषित करून ऐन वेळेला एबी फॉर्म नाकारल्याने माजी आमदार दिलीप माने यांना अश्रू अनावर झालेले बघायला मिळाले.

कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसने विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेवर पक्षाने त्यांना एबी फॉर्म नाकारला. त्यामुळे दिलीप माने यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर दक्षिणमध्ये ठाकरे गटाने पूर्वीच अमर पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे येथे ठाकरे गट विरुद्ध कॉंग्रेस असा वाद झाला होता. तर दुसरीकडे कॉंग्रेस मविआमध्ये राहून आघाडी धर्म पाळत स्वत:च्याच पक्षातील नादात स्वतः च्या जागा घालवत असल्याचं माने यांनी म्हंटलं आहे. यावेळी साम टीव्हीशी बोलताना दिलीप माने यांना अश्रु अनावर झाले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कुमकुवत भूमिका घेत असल्याचंही माने म्हणाले. दरम्यान, माने यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील कॉंग्रेस विरोधात अतिशय तीव्र भावना झाल्याचं चित्र दिसून आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT