Nana Patole SaamTv
Video

Nana Patole : रात्रीतून 76 लाख मतांची वाढ कशी झाली? पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ओढले ताशेरे

Nana Patole's Accusation On Election commision: कॉंग्रेसच्या टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत अचानक एवढी मतांची टक्केवारी कशी वाढली याचा पुरावा मागितला आहे.

Saam Tv

निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाचे प्रमाण 7.50 टक्क्यांनी कसे वाढले याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केली आहे. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या टक्केवारी विषयी जनतेला देत असते, अशी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. मात्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाने कोणताही पत्रकार परिषद घेतली नाही. रात्रीतून 76 लाख मतांची वाढ झाली, असा सवाल करत पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झाल्याचे निवडणूक आयोग सांगते. मतदान जास्त झाले असेल, तर त्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असतील. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदानाची नोंद निवडणूक आयोगाने केली. तर रात्री 65.2 टक्के मतदानाची नोंद आयोगाने केली. दुसऱ्या दिवशी 66 टक्के मतदाना झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. निवडणूक आयोगाने त्या लागलेल्या लाईनचे आम्हाला व्हिडिओ द्यावेत, असं म्हणत मतदानाच्या टक्केवारीत तफावत असून आम्ही यासंदर्भात कोर्टात जाणार असल्याचं नाना पटोले म्हणाले.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT