CM Eknath Shinde :  Saam tv
Video

Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, VIDEO

CM eknath Shinde on badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलक थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

Vishal Gangurde

बदलापूर : बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. रेल्वे ट्रॅकवर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा फास्टट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. या फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवला पाहिजे. त्यामुळे पुन्हा यासारखं घाणरेडं कृत्य कोणी करणार नाही. या संस्थेतील कर्मचारी असतील. त्यांची पूर्ण पार्श्वभूमी तपासून कामावर घेतले पाहिजे. मी संस्था चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात कोणालाही सोडता येणार नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

Water After Tea : चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिता? सावधान! होतात 'या' ३ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

SCROLL FOR NEXT