CM Devendra Fadnavis Meets Raj Thackeray  Saam Tv
Video

Maharashtra Politics: मनपा निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

CM Devendra Fadnavis Meets Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांना भेटत आहेत.

Priya More

राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट होत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरे यांना भेटत आहेत. या दोघांच्या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा होत आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

शिवाजी पार्कवरील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये त्यांनी विधानसभेच्या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि महायुतीवर त्यांनी टीका केली होती. त्यानंतरची मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या निवणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेऊन जाणार का? मनसे भाजपला पाठिंबा देते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याआधी देखील भाजपने स्पष्टता केली होती की राज ठाकरेंसोबतचे आमचे संबंध चांगले आहेत. भाजपने विधानसभेवेळी काही जागांवर राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये शेतात जखमी अवस्थेत आढळले बिबट्याचे बछडे

बदल्यांचा धडाका सुरूच! दोन IAS अधिकाऱ्यांची बदली

'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral

Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

SCROLL FOR NEXT