VIDEO: अवैध बांधकामांवर बुलडोजर फिरवा', पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री Eknath Shinde ॲक्शन मोडवर  Saam TV
Video

VIDEO: अवैध बांधकामांवर बुलडोजर फिरवा', पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री Eknath Shinde ॲक्शन मोडवर

Eknath Shinde On Pune Drugs News: अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंकडून निर्देश देण्यात आले आहेत. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT