Chandrapur Politics  Saam Tv
Video

Chandrapur News: अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये, कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार

Kishore Jorgewar Join BJP: चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत.

Priya More

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे आता जोरगेवार यांना चंद्रपुरातून भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. मागील काही दिवसांपासून जोरगेवार प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. शरद पवार यांच्या भेटीला ते गेले होते. पण तिथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली.

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी जोरगेवार यांना भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देण्याचे आदेश पक्षाने दिले आणि त्या आदेशावर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी हंसराज अहिर हे देखील उपस्थित होते. आज जोरगेवार यांच्यासह महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर आणि इतरांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. प्रारंभी मुनगंटीवार यांचा जोरगेवार यांच्या नावाला मोठा विरोध केला. पण पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे मुनगंटीवार समर्थकांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. हा असंतोष कसा थोपवून धरला जातो आणि त्यात नेत्यांना यश मिळेल का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग, प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध

Road Trip साठी खास लोकेशन, एकदा पाहाल तर प्रेमात पडाल!

Radhakrishna Vikhe Patil: 'त्या' वादावर राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले, जयश्री थोरात यांच्याबद्दल काय म्हणाले? वाचा...

VIDEO : महायुतीत उमेदवाराची अदलाबदल, भाजपच्या मुरजी पटेलांच्या हाती धनुष्यबाण! अंधेरी पुर्णमधून लढणार?

Latur Crime : जागेवर झोपल्याने राग अनावर; डोक्यात दगड टाकून संपविले, लातूरमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT