केंद्र सरकारने आता लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'NPS वात्सल्य' नावाची ही योजना सुरू केलीय. 0-18 वर्षांच्या मुलांसाठी ही योजना असणार आहे. या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकणार आहेत. 0-18 वर्षांपर्यंत हे खातं मुलांचे पालक चलवतील आणि त्यानंतर मुलांच्या नावे ही खातं होईल. मूल 18 वर्षांचं झाल्यानंतर हे खातं NPS खात्यात किंवा NPS नसलेल्या दुसऱ्या योजनेच्या खात्यात रूपांतरीत केलं जाऊ शकतं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या बजेटमधून NPS वात्सल्य ही एक नवी योजना जाहीर केली होती. पालक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ही योजना महत्त्वाची असणार आहे. ही योजना आज सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ केला आहे. दरम्यान, पुण्यात या योजनेच्या नोंदणीला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.