भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उलवेमध्ये केलेल्या आक्षेपहार्य वक्तव्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे येथे बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे हे सध्या चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी बरेच आंदोलन देखील केले आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य राणेंना भोवल आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाप्पाच्या दर्शनानंतर नितेश राणे यांनी भाषण केलं होत. यात त्यांनी सगळे व्यवहार फक्त हिंदूंसोबतच करावे, अशा प्रकारची अनेक वक्तव्य केली होती. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता तयार झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.